Saturday, May 30, 2009
सौ. गीता गोपाळ येडवे यांचा अपघाती मृत्यु
२८ में रोजी सालगाव येथील उन्चसखल रस्त्याच्या कारणाने मोटरसायकल वर बसलेल्या गीता गोपाल येडवे (55) रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर ईजा झाली उपचार करण्या पुर्वीच त्यांचे निधन झाले .त्या बांदा येथील असून पड़वे माजगाव येथे शिक्षिका होत्या. आपले पति गोपाळ उर्फ़ भाऊ येडवे यांच्या सोबत माणगाव येथील दत्त मन्दिर दर्शनास त्या जात होत्या.
नान्दोस हत्याकांड चार आरोपींना फाशी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोस गावात 2003 सालात लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा उठवून पैशाचा पाउस पडून लाखाचे दहा लाख करण्याचे सांगुन अनेक लोकांचे खून करण्यात आले होते २६ मे२००९ रोजी त्यातील आठ खून न्यायालयात सिद्ध झाले असून. संतोष चव्हाण ,योगेश चव्हाण ,महेश शिंदे, अमित शिंदे या चार आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
Friday, May 29, 2009
गुरुवार दिनांक २८ में २००९ रोजी श्री बान्देश्वर मन्दिर शिखर प्रतिष्ठापना संपन्न
श्री बान्देश्वर मन्दिर जीर्णोद्धार कार्य वेगात सुरु असून मंदिराच्या गर्भगृहाचा शिखर प्रतिष्ठान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला खास राजस्थानी ढोलपुरी दगडात कोरलेल्या या आकर्षक शिखराची गुरुपुष्यामृत योगावर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। ब्राम्हणवृन्दाच्या मंत्रघोशात आणि ढोल्ताशाच्या गजरात शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला श्रीधर पनशिकर यांच्या पुरोहित्या खाली मानकरी व्यक्तींच्या हस्ते शिखराची पूजा अभिषेक झाला हे शिखर बसवण्यातआले। या शिखाराचे टोक झुम्बरा सारखे गाभारा च्या आतील बाजुस येणार आहे
मंदिराचा अंदाजे खर्च तिन कोटि आहे त्यासाठी सर्वानी सहाय्य करावे.
मंदिराचा अंदाजे खर्च तिन कोटि आहे त्यासाठी सर्वानी सहाय्य करावे.
Thursday, May 14, 2009
Subscribe to:
Posts (Atom)