Sunday, October 18, 2009

श्री बान्देश्वर मन्दिर जीर्णोधार कार्य वेगात सुरु

ईश्वर कृपेने हा जीर्णोधार पाहण्याचे आणि हातभार लावण्याचे सदभाग्य आजच्या पीढीला लाभले आहे . त्यात प्रत्येकाने यथाशक्ति जास्तीत जास्त सहभाग घेणे गरजेचे आहे .

आमच्या सर्व वाचकाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा - आशुतोष उर्फ़ अमित भांगले अध्यक्ष - श्रीगुरु मिडिया फीचर्स,बांदा


माझ्या ब्लॉग ला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार

विशेष व्यक्तिमत्व - सुनील नाईक


सुनील नाईक हे बांद्यात १९७९ पासून कार्यरत असलेले पहिले पिग्मी एजंट आहेत


१९८२ मध्ये त्यानीच पहिली परमिट पसेंजर रिक्शा बांद्यात आणली


ते दूध सोसायटी अध्यक्ष आहेत


माजी ग्राम पंचायत सदस्य , माजी उपाध्यक्ष विकास सोसायटी आहेत


प्रगतिशील शेतकरी आहेत


असे हे विशेष व्यक्तिमत्व सुनील गंगाराम नाईक अद्याप सिंधुदुर्ग बँकेत आपली पिग्मी सेवा अविरत सुरु ठेवून आहेत.


दीपावली शो टाईम २००९ च्या पावती पुस्तकांचा विनायक गुरव यांच्या हस्ते शुभारंभ


दुखद निधन

सौ महानंदा अनंत येडवे (७२) यांचे ११ ऑक्टोबर रोजी दुखद निधन झाले त्या सतीश येडवे यांच्या मातोश्री होत्या
त्यापूर्वी नवरात्रोत्सव दरम्यान प्रसिद्ध लेडिज टेलर मिलिंद कल्याणकर यांचे हार्ट अटैक ने निधन झाले

नट वाचनालय बांदा आयोजित भावगीत गायन स्पर्धा

कोजागिरी पोर्णिमेनिमित्त नट वाचनालया तर्फे विवाहित महिलांसाठी भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उदघाटन नट चे अध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते अर्जुन नाइक ,सुरेश पंडित, उर्मिला जोशी, विमल तारी,भास्कर पावसकर यांच्या उपस्थितीत झाले
या प्रसंगी विमल तारी यांच्या वेणु या पुस्तकाचे प्रकाशन झाले

नट वाचनालय भावगीत गायन स्पर्धा क्षणचित्रे
















नट वाचनालय बांदा आयोजित भावगीत गायन स्पर्धेचा निकाल
















प्रथम क्रमांक - केतकी भिडे





द्वितीय क्रमांक - पल्लवी बर्वे





तृतीय क्रमांक - वरदा जोशी





उत्तेजनार्थ - अनघा मोघे , स्नेहा शिरसाट ,मीनाक्षी तेंडुलकर





Tuesday, October 6, 2009

बांद्यात पुर
















३ ऑक्टोबर ला बांद्यात आलेल्या पुराची क्षणचित्रे
















बांदा बाजारपेठेत २० वर्षानंतर पुराच्या पाण्याने धड़क दिली.